Surprise Me!

आता डोकं ही बदलता येणार, वैज्ञानिकाचा विचित्र दावा | Head Transplant News

2021-09-13 0 Dailymotion

आतापर्यंत मूत्रपिंड, यकृत, गुडघा आणि इतर अवयवांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियांबाबत आपण ऐकलं असाल!..पण आता मानवाच्या डोक्याचंही प्रत्यारोपण (हेड ट्रान्सप्लांट) करणं शक्य होणार आहे. एका वैज्ञानिकानं हा दावा केला आहे. एका मृतदेहावर डोके प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून येत्या काही दिवसांत जिवंत व्यक्तीवरही प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येईल, असं वैज्ञानिकानं सांगितलं. द इंडिपेंडेंटनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.<br />डोके प्रत्यारोपणासंबंधी सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. आता शस्त्रक्रिया केली जाऊ शकते, असा दावा इटलीचे वैज्ञानिक सर्गियो कॅनवेरो यांनी केला आहे. सर्गियो यांनी सुरुवातीला मृतदेहावर डोके प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली आहे. ती यशस्वी झाली आहे. त्यामुळे विकसित केलेल्या नव्या तंत्रज्ञानाद्वारे दोन वेगवेगळ्या शरीरांमधील हाडे, रक्तवाहिन्यांना यशस्वीपणे जोडता येणे शक्य होणार आहे, असाही दावा त्यांनी केला आहे. ही सर्वात कठिण शस्त्रक्रिया असून 18 तासांत पूर्ण केली जाऊ शकते, असंही त्यांनी म्हटलं आहे. मृतदेहावर डोके प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून आता ब्रेनडेड व्यक्तीवर शस्त्रक्रिया करायची आहे, असंही ते म्हणाले.सर्गियो यांनी केलेल्या दाव्यानंतर त्यांच्यावर टीकाही होत आहे. डोके प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा कोणताही पुरावा त्यांनी सादर केला नाही. त्यामुळे ही शस्त्रक्रिया करुन घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon